तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या shetiyojn.com या वेबसाईटवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपण शेतीविषयक वेगवेगळ्या महाराष्ट्र सरकारच्या योजना आपल्यापर्यंत घेऊन येतो. 2024 महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक वर्षामधील एक नवीन महत्वपूर्ण योजना शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली आहे त्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वीज सवलत योजना. तर या योजनेची संपूर्ण परिपूर्ण माहिती आपण या मध्ये पाहणार आहोत.
Mukhymantri Bali raja Veej savulat Yojana
तर शेतकरी मित्रांनो राज्यात 46 लाख 6 हजार कृषी पंप धारक शेतकऱ्यांची वीज बिल माफी देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेची घोषणा शुक्रवारी दिनांक 28 जून 2024 रोजी करण्यात आली. सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पना अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यामध्ये साडेसात अश्व शक्ती कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना या वीज बिल माफीचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. येणाऱ्या पुढील वीज बिलापासून या योजनेचा अंमल चालू होणार असून पुढील येणारे वीज बिल हे माफ होणार आहे. याकरिता 14 हजार 761 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पनात वीज बिल माफी चा अपवाद वगळता, शेतकऱ्यांना कोणतीही योजना किंवा कोणतीही कर्जमाफी देण्यात आलेली नाही. मागील योजनांचा आढावा घेत मागील योजना मध्ये किरकोळ दुरुस्ती करून सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पना महिला केंद्री योजनांना प्राधान्य दिले आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण | ladki bahin yojna
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मागील खरीप हंगामात कापूस व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये अर्थ साहाय्य देण्यात येणार होते. लोकसभा निवडणूक यादी जाहीर केलेल्या योजनेची अंमलबजावणी करण्याचा घोषणा अर्थ संकल्पना करण्यात आली होती.
विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना शेवटच्या टप्प्यात विज बिल माफीचा निर्णय जाहीर केल्यानंतर ”जय भवानी जय शिवाजी” असा उदघोष करण्यात आला. श्री अजित पवार म्हणाले राज्यात सध्या 47 लाखावरील शेतकरी 39 हजार 287 दशलक्ष युनिट इतकी विज वापरतात. आणि या विजेची किंमत 33 हजार 46 कोटी इतकी आहे. सध्या शासनाकडून शेतकऱ्यांना 6946 रुपये सबसिडी तर नऊ हजार पाचशे क्रॉस सबसिडी दिले जाते. शेतकऱ्यांना मोफत आणि दिवसाविषयी देण्यासाठी मुख्यमंत्री सौर्य कृषी वाहिनी योजना 2 सुरू आहे. मेगावात क्षमतेचे व्ही केंद्रीय सौर ऊर्जा प्रकल्प हाती घेण्यात आले आहे.
त्याचा अंमलबजावणीचा कालावधी 18 महिन्याचा आहे. सध्या राज्यातील 44,6000 कृषीपंप धारक साडेसात अश्वशक्तीचे पंप वापरत आहेत. या सर्व शेतकऱ्यांचे विज बिल मोफत करण्यात येणार आहे.
या योजनेचा जो काही भार पडेल तो महाराष्ट्र सरकार उचलणार आहे ही योजना गतिमान होण्यासाठी मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप या योजने अंतर्गत आठ लाख 50 हजार शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे.
या योजनेमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. असे शेतकरी की जे वीज बिल भरू शकत नव्हते त्यांना हा खूप मोठा फायदा होणार आहे त्यांना यापुढे कोणत्याही प्रकारचे वीज बिल आकारण्यात येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे हे योजना वरील दिलेल्या माहितीप्रमाणे अमलात येणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि इथून पुढे येणारे अपडेट आपल्या या वेबसाईटवर दिली जाईल.
धन्यवाद… 🙏🏻