तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची एक नवीन पूर्ण योजना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या योजनेचे नाव आहे महिला उद्योगिनी योजना.
महिला उद्योगिनी योजना काय आहे(udyoginu scheme):
• स्वतःच्या पायावर उभा राहून स्वावलंबी व्हावं म्हणून महिलांची खूप धडपड असते. एखादा व्यवसाय करून चांगलं उत्पन्न मिळवायचं म्हटलं तर, स्वतःजवळ भांडवल नसतं. त्यामुळे महिलांचे उद्योग उभा करण्याचा स्वप्न स्वप्नच राहतं. महिलांच्या जवळ कौशल्य असून सुद्धा महिलांना आपणास स्वतःचा उद्योग उभा करता येत नाही. हीच भाव शासनाने लक्षात घेऊन शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, आणि महिलांना बँका मार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगिनी योजना ही योजना अस्तित्वात आणली.
• या योजनेच्या अंतर्गत तीन लाखापर्यंत व्याज परतावा निरंक करण्यात आला आहे. यात कर्ज रकमेच्या तीन टक्के व्याज हे केंद्र शासना मार्फत भरण्यात येणार आहे. व चार टक्के व्याजदर राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. यामुळे तीन लाखापर्यंत बिनव्याजी महिलांना कर्ज उपलब्ध होणार आहे.
कोणत्या व्यवसायासाठी मिळणार कर्ज? :
• महिला उद्योगिनी योजनेअंतर्गत विविध व्यवसाय करण्यासाठी महिलांना कर्ज दिलं जातं. बहुतांश महिलांना प्रश्न पडला असेल? कोणत्या व्यवसायासाठी आम्हाला कर्ज मिळणार. तर त्यासाठी खालील प्रमाणे काही व्यवसाय दिलेले आहेत, यासाठी आपल्याला कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.
१. बांगड्या बनवण्याचा व्यवसाय.
२. ब्युटी पार्लर.
३. बेडशीट आणि टॉवेल बनवण्याचा व्यवसाय.
४. बुक बाईंडिंग, नोटबुक व्यवसाय.
५. कॉफी व चहा पावडर बनवण्याचा व्यवसाय.
६. मसाले, कापूस धागा उत्पादन.
७. रोपवाटिका, कापड, दुग्ध व्यवसाय.
८. पोल्ट्री संबंधित व्यवसाय.
९. डायग्नोस्टिक लॅब व्यवसाय.
१०. ड्रॉइं क्लिनिंग व्यवसाय.
११. सुक्या मासळी चा व्यवसाय.
१२. खाण्याचा व्यवसाय.
१३. खाद्यतेलाच्या दुकानाचा व्यवसाय.
बिनव्याजी कर्ज कोणाला मिळणारा? :
• उद्योगिनी योजनेअंतर्गत ज्या महिला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच शारीरिक विकलांग असतील, त्यांना बिनव्याजी कर्ज देण्यात येईल. येवला ती तर महिलांना अल्प दरात व्याजदर आकारण्यात येईल.
उद्योगिनी योजना अटी व शर्ती :
• या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिला 18 ते 45 या वयोगटातील असणे आवश्यक आहे.
• विधवा निराधार असणाऱ्या महिलांना यामध्ये वयाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही.
• योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना कोणत्याही जामीनदाराची गरज भासणार नाही.
• कर्ज परतफेड चा कालावधी सात वर्षाचा असेल.
• अर्जदार महिलेचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा जास्त नसावे.
उद्योगिनी योजना अर्ज प्रक्रिया ( application process) :
•इच्छुक व पात्र असलेल्या महिलांनी उद्योगिनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळील खाजगी किंवा सरकारी बँकांना भेट द्यावी लागेल. त्या बँकातून महिलांना कर्ज दिलं जातं, त्यामध्ये पंजाब बँक, सिंध बँक, सारस्वत बँक इत्यादी बँकेचा समावेश आहे. यामधून सहजरित्या महिलांना कर्ज उपलब्ध होईल.
•
प्रति महिना 2250 रुपये अनुदान | बाल संगोपन योजना | Bal sangapan Yojana
Balasangopan Yojana : तर नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या ब्लॉगवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज परत एकदा आपण एका नवीन …