प्रति महिना 2250 रुपये अनुदान | बाल संगोपन योजना | Bal sangapan Yojana

Balasangopan Yojana :

तर नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या ब्लॉगवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज परत एकदा आपण एका नवीन योजनेविषयी माहिती पाहणार आहोत बालसंगोपन योजना.

krantijyoti Savitribai Phule balsangopan Yojana:

• बालन्याय (मुलाची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मधील सुधारित अधिनियम 2021 कलम 2 (14) व महाराष्ट्र राज्याचे बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 नुसार निअशत्रित,निराधार, अनाथ  संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेले. 0 ते 18 वयोगटातील मुलांना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्याय कुटुंब उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात ही बाल संगोपन योजना सुरू करण्यात आली.

• सदरील योजना संस्था बाह्य असून या योजनेअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुला मुलींना थेट पर्यायी कुटुंबात संगोपणासाठी ठेवण्यात येते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजने अंतर्गत आई,वडील गमावलेल्या मुला मुलींना 27 हजार इतकि मदत राज्य शासनाकडून केली जाते. सदर योजनेसाठी प्रस्ताव करण्याची प्रक्रिया सुरू झाल्या असून. लाभार्थी कुटुंबातील सांभाळ करणारी व्यक्ती अर्ज करू शकते.

बाल संगोपन योजनेचा फायदा खालील प्रमाणे या मुलांना देण्यात येईल :

• अनाथ किंवा ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नसेल, ज्यांना दत्तक घेणे शक्य होत नाही.

• एक पालक असलेले बालक, घटस्फोट, अविवाहित मातृत्व, परित्याग, विभागीकरण, गंभीर आजार,  पालक दवाखान्यात असणे इत्यादी कारणामुळे विघटित झालेल्या, एक पालक असलेल्या कुटुंबातील बालके. कुष्ठरोग व जन्मठेप भोगत असलेल्या वडिलांचे बालके.

• बहु विकलांग बालक.

• कोरोना काळामध्ये एक किंवा दोन्ही पालकत्व गमावणारे बालक.

• तीव्र मतिमंद, एचआयव्ही बाधित, अपंग पालक इत्यादी असणारे बालक.

• यांचे दोन्ही वडील अपंग असतील अशी मुले.

• बालकामगार विभागाने प्रमाणित केलेले.

आर्थिक मदत किती :

बाल संगोपन योजना अंतर्गत आता नवीन सुधारित शासन नियमानुसार वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत दर महिना 2250 रुपये मुलांच्या किंवा पालकांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील. वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ही योजना त्या मुलांना लागू होण्याचे लागू होणार नाही तरी ही योजना खंडित करण्यात येईल आहे.

बाल संगोपन योजना आवश्यक :

• रहिवासी दाखला.

• लाभार्थी बालकांचा पासपोर्ट साईज चा फोटो.

• बँक पासबुक झेरॉक्स.

• बालकाचा जन्माचा दाखला.

• उत्पन्नाचा दाखला.

• पालकांचा संगोपनाचे हमीपत्र.

• सांभाळ करणाऱ्या पालकांचे फिटनेस.

• लाभार्थी बालकाचे व पालकांचे आधार कार्ड.

• आई-वडिलांचे मृत्यु प्रमाणपत्र.

• बालकदर शाळेत शिकत असेल तर विद्या च्या शाळेचा बोनाफाईड प्रमाणपत्र.

बाल संगोपन योजनेसाठी अर्ज कोठे व कशा प्रकारे करावा :

बाल संगोपन योजनेसाठी अर्ज करण्याची कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन प्रोसेस संबंधित विभागाकडून देण्यात आलेले नाही. त्यामुळे लाभार्थी कुटुंबातील सांभाळ करणाऱ्या व्यक्तींनी बाल संगोपन योजनेचा अर्ज किंवा बाल संगोपन योजना अर्ज  पीडीएफ नमुना संबंधित जिल्ह्याचे किंवा तालुक्याच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी(ICDC) कार्यालय जमा करावी. अर्ज जमा केल्यानंतर संबंधित विभागाकडून अर्जाची पडताळणी केली जाईल. त्यानंतर लाभार्थी बालक पात्र असल्यास अंतिम मंजुरी करून दर महिना रक्कम जमा केली जाईल.

Sharing Is Caring:

Leave a Comment