२ करोड महिला होणार लखपती | lakhpati didi Yojana

Lakhpati Jiji Yojana Maharashtra 2024!

नुकता देशांमध्ये 77 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण करतेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यामार्फत या महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा करण्यात आली. ती योजना म्हणजे लखपती दीदी योजना होय. सदर योजना काही राज्यांमध्ये आधीपासून म्हणजेच चार नोव्हेंबर 2022 पासूनच अस्तित्वात होती. परंतु आता केंद्र शासनाकडून दोन करोड महिलांना लखपती बनवण्यासाठी लखपती दीदी योजना ही योजना सुरू करण्यात आली आहे.

खेड्यापासून शहरापर्यंत आपण जर पाहिलं, तर खेड्यातील अंगणवाडी पासून शहरातील बँका पर्यंत सर्व क्षेत्रात महिला अग्रगण्य म्हणून काम करत असताना आपल्याला पहायला मिळतात. अशा महिलांना संबंधित पंतप्रधान म्हणाले की गावातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांना दीदी म्हणून संबोधले जाते. अशा महिलांना लखपती बनवण्याचे धोरण शासन आखात आहे. आणि याच योजनेला lakhpati didi Yojana असे संबोधले जात आहे.

लखपती दीदी योजना उद्देश :

सदर योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजेच बचत गटाशी संलग्न असणाऱ्या महिलांना विविध कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवून त्यांना लखपती करणे हा होय. प्रशिक्षणामध्ये महिलांना प्लंबिंग, एलईडी बल निर्मिती, ड्रोन चालवणे, विविध यंत्र सामग्री दुरुस्ती शिकवणे अशाप्रकारे विविध कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल. शासनाच्या या निर्णयामुळे महिलांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारेल. त्यामुळे महिला सक्षम व स्वावलंबी बनतील आणि हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

लखपती दीदी योजना कागदपत्रे (documents):

• अर्जदार महिलेचे आधार कार्ड

• पॅन कार्ड झेरॉक्स

• पासपोर्ट आकाराचा फोटो

• चालू मोबाईल नंबर

• अर्जदाराचे बँकेचे पासबुक झेरॉक्स

• शैक्षणिक कागदपत्र

Lakhpati DJ Yojna Eligibility (पात्रता):

• सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार महिला असणे आवश्यक आहे.

• बचत गटाच्या सदस्य असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.

• अर्जदार महिलांचे वार्षिक उत्पन्न कमीत कमी असावे.

• अर्जदार महिला भारताच्या रहिवासी असाव्या.

• सदर योजनेत समाविष्ट झाल्यानंतर महिलांची प्रशिक्षण घेण्याची तयारी असावी.

महिलांना मिळणारा हा लाभ :

नावाप्रमाणेच या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजेच महिलांना विविध क्षेत्रातील प्रशिक्षण वार्षिक सहाय्य जीवन लखपती बनवले जाईल. महिलांना लघुउद्योग करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. त्याचप्रमाणे लघुउद्योग करण्यासाठी लागणारे प्रशिक्षण व यंत्रसामुग्री दिली जाईल.

How to apply ऑनलाईन (ऑनलाइन अर्ज कसा भरायचा):

देशातील सर्व स्वयं सहाय्यता बचत गट महिला सदस्यांना लखपती दीदी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही काळ प्रत्यक्ष करावी लागणार आहे. कारण सदर योजनेची अर्ज प्रक्रिया शासनाकडून सुरू करण्यात आलेले नाही ; परंतु नुकतीच या योजने संदर्भातील घोषणा करण्यात आली असल्यामुळे ही योजना लवकरात लवकरच सुरू करण्यात येईल. त्यानंतर परत ते एखादा सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देऊ. त्यानंतर तुम्ही लखपती दीदी योजना या योजनेसाठी अर्ज करू शकाल व व ही योजना मिळवू शकाल.

Sharing Is Caring:

Leave a Comment