नमस्कार मित्रांनो आपल्या ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज फोन नाही एकदा आपण एक नवीन योजनेबद्दल माहिती घेणार आहोत त्या योजनेचे नाव आहे दिव्यांग मुदत कर्ज योजना. आणि आजची ही माहिती खास दिव्यांग बांधवांसाठी व भगिनींसाठी असणार आहे कारण ही स्कीम दिव्यांग मित्रांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने चाललेली योजना आहे. यामध्ये दिव्यांग बंधू भगिनींसाठी आपला उद्योग उभारण्यासाठी 50 हजार ते पाच लाखापर्यंत चे बिनव्याजी कर्ज महाराष्ट्र सरकार देणार आहे. तर आता यामध्ये आपण पाहणार आहोत या या योजनेसाठी पात्रता काय आहे अर्ज कोठे करायचा आहे, हो काय काय कागदपत्र लागणार आहेत, ही सर्व माहिती आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत.
दिव्यांगांसाठी मुदत कर्ज योजना :
महाराष्ट्रातील अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी. महाराष्ट्र शासनामार्फत 3 डिसेंबर 2001 रोजी जागतिक अपंग दिनाचा मुहूर्त साधून महाराष्ट्र राज्य अपंग वित व विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. राज्यातील बेरोजगार अपंग बंधू भगिनींना स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी खूपच अल्प व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्याचप्रमाणे अपंगांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना या महामंडळातर्फे राबविण्यात येतात.
या योजनेअंतर्गत कोणत्याही अपंग पात्र व्यक्तीला लघुउद्योग, प्रक्रिया उद्योग,वस्तू उत्पादन, गृह उद्योग इत्यादींसाठी अल्प व्याजारात 50 हजार ते पाच लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये परतफेडची मुदत पाच वर्ष आहे.
योजनेच्या प्रमुख अटी व शर्ती :
• लाभार्थी किमान 40 टक्के अपंग असावा.
• लाभार्थी किमान पंधरा वर्षाचा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
• लाभार्थ्याचे वय 18 ते 60 वर्षे या वयापर्यंत असावे.
• लाभार्थी कोणत्याही बँकेचा, पतसंस्थेचा, महामंडळाचा किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
• लाभार्थ्यांनी जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायातील मूलभूत ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे.
• याव्यतिरिक्त कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ जे ठरवेल त्याप्रमाणे असतील.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :
• आधार कार्ड.
• मतदान ओळखपत्र.
• बँक पासबुक.
• रहिवाशी दाखला.
• पासपोर्ट साईज तीन फोटो.
• कर्जबाजारी नसले बाबत न देय दाखला.
• वयाचा दाखला.
• करत असलेल्या व्यवसायाचा माहिती.
• व्यवसायाची जागा भाडेतत्त्वावर असल्यास 100 च्या स्टॅम्प वर मालकाचे संमती.
• व्यवसायाच्या प्रकल्पाची माहिती.
• व्यवसाय प्रस्ताव प्रकल्प.
• याव्यतिरिक्त इतर आवश्यक कागदपत्रे महामंडळातर्फे मागवले जातील.
अर्ज कसा व कुठे करायचा :
इच्छुक व पात्र अपंग लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळात विहित नमुनेतील अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करू शकतात.