75 टक्के अनुदान मोफत शिलाई मशीन मोफत कडबा कुट्टी मशीन शंभर टक्के अनुदान कुक्कुटपालन | 14 पंचायत समिती योजना.

तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी पुन्हा एकदा नवनवीन योजना घेऊन आलो आहे. तर मित्रांनो आज आपण पंचायत समिती मार्फत राबवले जाणाऱ्या विविध 14 योजनांचा आढावा येथे घेणार आहोत.

 Panchayat Samiti Yojana| पंचायत समिती योजन. :

• राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. ज्यामध्ये शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांचा समावेश असतो. काही योजना सर्वसमावेशक नसतात. ज्यामुळे नागरिकांना संबंधित योजनेचा लाभ मिळत नाही. हीच बाब लक्षात घेऊन शासनाच्या स्थानिक विभागाकडून योजना राबवण्यात यावी यासाठी पंचायत समिती योजना सुरू करण्यात आले.

• पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकरी वर्गापासून महिलापर्यंत विविध अशा योजना राबविण्यात येतात. या अंतर्गत त्यांना साहित्य\उपकरणे वाटप. मानधन इत्यादी देण्यात येते. विविध जिल्ह्यातील पंचायतीसाठी आवश्यकतेनुसार योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

पंचायत समिती कृषी विभाग योजना :

• 75 टक्के अनुदानावर इलेक्ट्रिक मोटर संच.

• 75 टक्के अनुदानावर कडबा कुटी यंत्र.

• 75 टक्के अनुदानावर प्लास्टिक क्रेट्स. (क्षमता -20kg)

• 75 टक्के अनुदानावर ताडपत्री ( प्लास्टिक 6×6 मीटर gsm)

• 75 टक्के अनुदानावर सिंचनासाठी PVC पाईप \ HDPE पाईप.

• 75 टक्के अनुदानावर पीक संरक्षण / तन नाशक औषध कीटकनाशक व बुरशीनाशक.

पंचायत समिती पशुसंवर्धन योजना विभाग :

• पशुपालकांना एक सिंगल फेज 2HP इलेक्ट्रिक कडबा कुट्टी मशीन मोटरसह (75 टक्के अनुदान)

• मिल्किंग मशीन : पशुपालकाना मिल्किंग मशीन ( अनुदान 75 टक्के ) जास्तीत जास्त अनुदान दीड लाख रुपये पर्यंत असेल.

• कुकुट पालन ( एक महिना वयाच्या कडकनाथ जातीच्या पक्षांचा 50 पीलांचा एक गट.) ( अनुदान 75 टक्के )

 मैत्रिणी योजना :मैत्रिणी योजने अंतर्गत महिलांना 50 ते 70 टक्के अनुदानावर पाच शेळ्यांचा गट वाटप करण्यात येतो .

महिला व बालकल्याण विभाग योजना :

• ग्रामीण भागातील 18 वर्षे पूर्ण असणाऱ्या महिलांना लायसन मिळवण्यासाठी अनुदान योजना.(3000₹)

• मोफत पिठाची गिरणी :ग्रामीण भागातील महिलांना मोफत पिठाची गिरण पुरवणे.

• शिलाई मशीन : ग्रामीण भागातील महिलांना मोफत शिलाई मशीन पुरवणे.

• इयत्ता सातवी ते बारावी पास मुलींना संगणक प्रशिक्षण देणे.

• एम एस सी आय टी पूर्ण करणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांना त्यांच्या खात्यावर साडेतीन हजार रुपये जमा करण्यात येईल.

अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

• जातीचा दाखला.

• आधार कार्ड.

• रहिवाशी दाखला.

• उत्पन्नाचा दाखला.

• लाईट बिल.

• अनुभव प्रमाणपत्र. (शिवणकाम)

• पासपोर्ट साईज फोटो.

• बँक पासबुक.

• शासकीय नोकरी नाही व लाभ घेतला नाही याची हमीपत्र.

 अर्ज प्रक्रिया :

• महाराष्ट्रातील पंचायत समिती विभागाकडून राबवण्यात  येणाऱ्या जवळपास सर्व योजना या ऑफलाइन पद्धतीने राबवण्यात येतो. परंतु कधीकधी गुगल फॉर्मच्या माध्यमातून किंवा शासनाच्या अधिकृत व इतर वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज सुद्धा मागविण्यात येतात. सद्यस्थितीत सरकारच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत का? त्याची खात्री करून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पंचायत समिती कार्यालयात भेट देऊन चौकशी करावी लागेल…

Sharing Is Caring:

Leave a Comment