शेतकऱ्यांच्या मुला मुलींना 15 लाख रुपये मिळणार! श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना!education loan scheme

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो जे काय आपली शेतकरी बांधवांचे मुले मुली शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे. त्यांना शिक्षणासाठी 15 लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तर महाराष्ट्र सरकारने श्रम विद्या शैक्षणिक कर्ज ही योजना चालू केलेली आहे जेणेकरून गरीब कुटुंबातील शेतकरी गरजू मुलांना त्यांच्या पुढील शिक्षणाकरता आर्थिक हातभार लावता यावा.

आणि हे कर्ज पूर्णपणे विना व्याजी असणार आहे.

तरी याच योजनेची पूर्णपणे माहिती आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत उदाहरणार्थ या योजनेचा अर्ज कोठे, भरायचा कसे भरायचा, या योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे कोणती या योजनेसाठी पात्रता काय आहे इत्यादी.

Shram Vidya Yojana education loan scheme – मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत राज्यातील शेतकऱ्यांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी दिनांक 19 मे रोजी एक महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मुला मुलींना सहजरित्या शैक्षणिक कर्ज उपलब्ध होता यावे यासाठी श्रमविद्या शैक्षणिक कर्ज ही योजना राबवण्यात येत आहे. तरी या योजनेबद्दलची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहूया.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने व राज्यातील बँकांच्या सहाय्याने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शून्य टक्के व्याजदर शैक्षणिक कर्ज उपलब्ध होणार आहे. यासाठी श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना राज्यात सुरू करण्यात आली असून यावेळी अंतर्गत लवकरात शून्य टक्के व्याजारात सहकारी बँकेच्या सहाय्याने शेतकऱ्याच्या मुला मुलींना कर्ज देण्यात येईल.

नव्याने सुरू करण्यात आलेल्या शेतकरी कर्ज योजनेचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते पार पाडण्यात आले आहे. उद्घाटनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला मुलींचा व सामान्य जनतेचा उद्धार करण्याचा हेतूने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

लाभार्थी कोण असणार –

• श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ 2023 पऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला मुलींना मिळणार आहे. ज्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे मुलगी किंवा मुलगा बारावी पास झाला असेल. तर पुढील पदवी शिक्षणासाठी हे शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.

• कर्जासाठी तारण किंवा कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारण्यात येणार नाही.

• पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी पाच लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येईल.

• 90 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला एक लाख रुपये पर्यंतचे पारितोषिक बक्षीस देण्यात येईल.

श्रमविद्या शैक्षणिक कर्ज व्याजदर –

• 5 लाखापर्यंत चे कर्ज : 0% व्याज दर.

• 5 ते 10 लाखांचे कर्ज : 2% व्याज दर.

• 10 ते 15 लाखांचे कर्ज : 4% व्याज दर.

अर्ज कसा करायचा(application proses):

• मित्रानो ही योजना नुकतीच सुरु करण्यात आली असून पुढील 2 ते 3 महिन्यात या योजनेची अंमलबजावणी प्रत्येक बँका मार्फत करण्यात येईल आणि त्यानुसार कर्ज वाटपाची जी काही प्रोसेस असेल, ती सुरु करण्यात येईल.

• तुम्हाला या योजनेसाठी तुमच्या जवळील बँकेमध्ये जावे लागेल व तेथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल, कारण या योजनेची पूर्ण प्रोसेस ही ऑफलाईन पद्धतीची आहे… 🙏🏻

Sharing Is Caring:

Leave a Comment