तर नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्या shetiyojn या वेबसाईट वर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. या वेबसाईटवर आपण शेतीविषयक वेगवेगळ्या योजनांचा आढावा घेत असतो अशीच एक शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारी योजना आपण येथे पाहणार आहोत ती योजना म्हणजे गाय गोठा अनुदान योजना होय.
सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण अशी असणारी गायगोटा अनुदान योजना ही योजना आहे. त्यामुळे या योजनेचे संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत.
गाय गोठा अनुदान योजना योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जनावरांसाठी पक्या स्वरूपाचा गोठा (शेड) बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक अर्थसहाय्य केले जाते.
आपल्या राज्यातील जवळपास सर्व शेतकऱ्यांकडे गाई म्हशी शेळी मेंढी इत्यादी पशुपालन उपलब्ध असते पण त्यांना राहण्यासाठी चांगल्या पद्धतीची शेड किंवा गोटा उपलब्ध नसतो त्यामुळे शेतकऱ्यांना व शेतकऱ्यांच्या पशु-पशूंना ऊन वारा पाऊस यांच्यापासून रक्षण करणे व त्यांची निगा किंवा सांभाळ करणे भरपूर अवघड जाते. व त्यांच्या समोर त्या जनावरांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान तयार होते. त्यामुळे राज्यातील प्रत्यक्ष शेतकऱ्यांना गाय गोठा अनुदान योजना ही योजना महत्त्वपूर्णरित्या कामाची ठरणार आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या गावामध्ये रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे गावातील शेतकरी स्थलांतर कडून शहराकडे येतात व मोठ्या प्रमाणात नोकरीच्या शोधात भटकत असतात. ते स्थलांतर थांबवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून ही योजना राबवण्यात येत आहे. केंद्राच्या मनरेगा योजना अंतर्गत दिला जाणारा रोजगार सुद्धा या योजनेअंतर्गत जोडण्यात आलेला आहे.
- योजनेचे नाव – Gay Gotha Yojna
- योजनेची सुरुवात – 3 फेब्रुवारी 2021
- विभाग – कृषी विभाग
- कोणी सुरू केली – महाराष्ट्र शासन
- लाभार्थी कोण – महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकरी
- लाभ – जनावरांच्या गोठा बांधण्यासाठी अनुदान
- योजनेच्या उद्देश – शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे.
- अर्ज प्रक्रिया – ऑनलाइन पद्धतीने
गाय गोठा अनुदान महाराष्ट्र राज्य 2024 उद्दिष्टे
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना समृद्ध करणे आणि स्वयंपूर्ण करणे हा महत्वपूर्ण उद्देश समोर ठेवूनच गाय गोठा अनुदान ही योजना सुरू करण्यात आली.
- शेतकऱ्यांच्या जनावरांचे पशुपक्ष्यांचे ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण व्हावे व त्यांना चांगल्या पद्धतीचा आसरा उपलब्ध व्हावा हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे.
- त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे व त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा आहे एक हेतू या योजने मागील आहे.
- शेतकऱ्यांना त्यांच्या पशूंना जनावरांना गोठा बांधण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे हे या योजनेमागील मुख्य उद्देश आहे आणि या योजनेद्वारे शेतकऱ्यांना अर्थसहाय्य पुरवले जाते.
- याचबरोबर नवीन शेतकरी युवकांना या व्यवसायामध्ये उत्साहित करणे व हा व्यवसाय करण्यास प्रेरित करणे हाही एक उद्देश या योजनेमध्ये आहे.
योजनेची वैशिष्ट्ये
- या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना पशुपालना साठी शेड किंवा गोठा बांधण्यासाठी आर्थिक स्वरूपात अनुदान देण्यात येते.
- या योजनेअंतर्गत मिळणारी अनुदानाची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट dbt स्वरूपात जमा करण्यात येते.
- गाय गोठा अनुदान ही योजना शरद पवार ग्राम समृद्ध विकास योजना या अंतर्गत सुद्धा ओळखले जाते.
योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान
आपल्या राज्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या कडे गाय किंवा म्हैस असतेच कारण शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीबरोबर दूध व्यवसाय हा एक महत्त्वपूर्ण व्यवसाय असतो आणि यातूनच त्याचे आर्थिक विकासही होत असतो. परंतु हा व्यवसाय करताना शेतकऱ्यांना खूप भरपूर अडचण येतात त्यातील महत्त्वपूर्ण अडचण म्हणजे गाईंसाठी मशीन साठी निवारा नसतो किंवा योग्य जागा उपलब्ध नसते त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पशु खडबडीत किंवा ओबडधोबड जागेतच बांधावे लागतात.
ग्रामीण भागातील बहुतांश कोठे हे कच्चे स्वरूपाचे बांधले जातात. जनावरांचे शेण व मूत्र साठवण्यासाठी योग्यरीत्या व्यवस्थापन केलं नसल्यामुळे शेण व मूत्र गोठ्यामध्ये इतरत्र पसरलेले असते. तसेच पावसाळ्यामध्ये या गोट्याचे दलदलीत रूपांतर होते आणि शेतकऱ्यांच्या व पशुंच्या अडचणीत आणखीन वाढ होते. आणि याचमुळे जनावरांना वेगवेगळे आजार उद्भवतात.
यातील मुख्य आधार म्हणजे स्तनदा आजार. या आजारामुळे कित्येक शेतकऱ्यांचे गोठ्याच्या गोठे बाद झालेले आहेत. कारण या दरामध्ये म्हशीच्या किंवा गायीच्या कासेला आजार होतो आणि यामध्ये शेतकऱ्यांचा हजारो रुपये का खर्च होतो आणि कित्येक वेळेला तो आधार पूर्णपणे बरा सुद्धा होत नाही.
अस्वच्छतेमुळे जनावरांच्या अंगाच्या खालील बाजूस मोठ्या प्रमाणात जखमा होतात. बरेच ठिकाणी जनावरांना चारा देण्यासाठी गव्हाणे सुद्धा उपलब्ध नसतात. आणि त्यामुळेच गाईच्या किंवा म्हशीच्या समोर तो चारा टाकला जातो आणि मग ते जनावर त्या चाऱ्यावर शेण किंवा मूत्र टाकते व तो चारा खराब होतो.
गोट्यातील ओबडधोबड जागेमुळे शेतकऱ्यांना महत्त्वाचे असणारे शेण सुद्धा येथे अनेक वेळेला इतरत्र पसरून किंवा खराब होऊन जाते. कारण जनावरांचे मलमूत्र हे एक महत्त्व चे सेंद्रिय खत आहे आणि यामुळे जमिनीची परपक्वता वाढते आणि जमीन चांगल्या प्रकारे तयार होते. पण चांगला होता नसल्यामुळे हे असे महत्त्वाचे धन शेतकऱ्यांच्या हातातून सहजपणे जाते.
त्यामुळे जनावरे बसण्याची जागा कॉंक्रिटीकरण करून सपाटीकरण केल्यास हे महत्त्वाचे धन शेतकऱ्यांना सहजरित्या उपलब्ध होऊ शकते कारण ते चपातीकरण असलेल्या काँक्रीट गोट्यावरून एक ठिकाणी गोळा करून एका खड्ड्यामध्ये साठवता येते.
तसेच गाईंना योग्यरीता गव्हाणी बांधून त्यामध्ये गायींची चाऱ्याची व्यवस्था केली तर गायींच्या किंवा मशीनच्या साऱ्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बचत होते.
- या योजनेअंतर्गत गाय किंवा म्हैस यांच्यासाठी एक पक्क्या गोट्याचे निर्माण करण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत दोन ते सहा गुरांसाठी एक गोठा उपलब्ध करून देण्यात येईल. आणि त्यासाठी 77,188 रुपये अनुदान दिले जाईल.
- सहा पेक्षा जास्त गुरांसाठी म्हणजेच 12 गुरांसाठी दुप्पट अनुदान देण्यात येईल.
- 12 पेक्षा जास्त गुणांसाठी म्हणजेच 18 गुरांसाठी तीपट अनुदान देण्यात येईल.
- गुरांसाठी 26.95 चौरस मीटर जमीन पुरेशी धरण्यात आलेले आहे. तसेच लांबी 7.7 मीटर व रुंदी 3.5 मीटर असेल. गव्हाण 7.7 मीटर × 0.2 मीटर × 0.65 मीटर. आणि 250 लिटर मोटरसायनचे हौदा बांधण्यात येणार आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी दोनशे लिटर टाकी बांधण्यात येणार आहे.
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मनरेगा योजना निकषानुसार स्वतःची जमीन, वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे असलेले लाभार्थी पात्र असतील. गोठ्याच्या प्रस्ताविकासह जनावरांचा टॅग आवश्यक राहील.
योजनेसाठी आवश्यक पात्रता
• अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
नियम व अटी
- फक्त महाराष्ट्रातील रहिवासी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्य व्यतिरिक्त इतर कोणत्याही राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वपूर्ण म्हणजे स्वतःची जमीन व इतर कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- प्रत्येक योजनेच्या अनुदानासाठी वेगवेगळे अर्ज करणे महत्त्वाचे आहे गरजेचे आहे.
- उपलब्ध पेशंटचे जीपीएस मध्ये टॅगिंग करणे आवश्यक आहे.
- या योजनेचा फायदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना देण्यात येईल.
- आर्थिक दृष्ट्या गरीब असणारे शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ मिळेल.
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड.
- रेशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका.
- अर्जदार शेतकरी असणे महत्त्वाचे.
- अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचे फोटो.
- अर्जदाराच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
- अर्जदाराचे मतदान ओळखपत्र.
- अर्जदाराचा आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर.
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक (15 वर्षापेक्षा जास्त वास्तव्य असण्याचा दाखला )
- अर्जदार ग्रामीण भागातील रहिवासी असणारा दाखला.
- आदिवासी प्रमाणपत्र.
- जन्माचे प्रमाणपत्र.
- जातीचे प्रमाणपत्र.
- या योजनेआधी कोणत्याही गोठा बांधण्याच्या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे हमीपत्र जोडणे आवश्यक.
- ज्या जागे शेठ बनणार आहे त्या अर्जदारासहित सह हिस्सेदार असल्यास त्यांचे प्रमाणपत्र / ना हरकत दाखला.
- ग्रामपंचायत शिफारसपत्र.
- अर्जदाराकडे अल्पभूधारक असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
- अर्जदाराकडे पशुधन पर्यवेक्षक, सरपंच व ग्रामसेवक यांनी दिलेले पशुधन उपलब्ध प्रमाणात असणे आवश्यक.
- अर्जदाराकडे कुटुंबाचा नरेगा ओळखपत्र व जॉब कार्ड असणे आवश्यक.
- अर्जदारांना जनावरांच्या गोठा बांधणीचे अंदाजपत्रक जोडणे आवश्यक.
इत्यादी बाबी जर तुम्ही पूर्ण करत असाल तर या योजनेसाठी तुम्ही पात्र होऊ शकता आणि गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत जीटी रक्कम तुम्ही आपल्या बँक खात्यामध्ये जमा करून घेऊ शकता.
धन्यवाद… 🙏🏻